Shri Swami Samarth | श्री स्वामी समर्थ

swami

श्री स्वामी समर्थ

जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था…

आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा ॥धृ॥

छेली खेडेग्रामी तू अवतरलासी।

जगउध्दारासाठी राया तू फिरसी ॥

भक्तवत्सला खरा, तू एक होसी।

म्हणूनी शरण आलो, तुझे चरणाशी ॥१॥

जय त्रैगुण परब्रम्ह, तुझा अवतार।

त्याची काय वर्ण, लीला परामर॥

शेषादिक शिणले, न लगे त्या पार।

जेथे जडमूढ कैसा, करु मी विस्तार ॥२॥

जय देवादि देवा, तू स्वामीराया।

निर्जर मुनिजन ध्यातो, भावे तंव पाया।

तुजसि अर्पण केली, आपुली ही काया ॥

शरणागता तारी तू स्वामीराया ॥३॥

जय अघटीत लीला करुनी जडमूढ उध्दारिले ।

किर्ती ऐकूनी कानी, चरणी मी लोळे ॥

चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले।

तुझ्या सुता न लगे, चरणा वेगळे ॥४॥ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *