श्री स्वामी समर्थ आरती

ओवळा ओवाळ माझ्या सद्गुरू राया माझ्या स्वामी राया

पंचहीतत्वांच्या पंचहीतत्वांच्या ज्योती लाविल्यायना ।।

 

निराकार वस्तू कैसी आकारा आली

सर्वांघटीं व्यापक माझी स्वामी माऊली ||

 

सोळासहस्त्र बहात्तरकोटी काया रखिली
स्वामींनी काया रखिली
नव खिडक्यांचा जोड आता मूर्ती बसविली ।।

 

सप्त सागर कैसा खेळ मांडीला स्वामीने खेळ मांडीला

 तुका म्हणे बाप माझा कैवारी आला ।।

 

ओवळा ओवाळ माझ्या सद्गुरू राया माझ्या स्वामी राया 

पंचहीतत्वांच्या पंचहीतत्वांच्या ज्योती लाविल्यायना ||

Verified by MonsterInsights